😋😋😋😋😋🤤😋😋😋😋😋 |
आता उन्हाळा संपेल नाही का म्हणजे आंब्याचे पण सिजन संपणारच की खुप आठवण येईल नाही का आंब्याची तर मग आपण असा केला तर कच्चाआंब्याचे चविष्ट लोणचं बनऊन ठेवले तर वर्ष भर आपल्या ला आंब्याचा स्वाद घेता येईल चला तर मग आज आपण चविष्ट लोणचं कशे बनवायचे ते बघुया आणि ह लोणचं बनवल्या वर कशे झाले हे मात्र सांगायला विसरू नका बरं का 🥰😍
कच्चा आंब्याचे लोणचे
कच्चा आंब्याचे लोणचे
कोणत्याही भारतीय कुटुंबात किंवा कोणत्याही खाद्यपदार्थ किंवा किराणा दुकानात लोणचे आपल्याला हमखास आढळते. याला स्वादिष्ट बनविणे अतिशय सोपे असते. सामान्यपणे उन्हाळ्यात कैऱ्या उपलब्ध असतात; प्रत्येक भारतीय कुटुंबाला हे लोणचे बनविण्याची अतिशय आवड असते.
*चला तर मग करुया का आपन कच्चा आंब्याचे चविष्ट लोणचे😋🥰
रेसपी टैग
साहित्य
100 ग्रॅम कच्चा आंबा -
1/4 चमचे मेथी
3 चमचे जीरे
8 चमचे मोहरी
१/4 चमचा हिंग
१/२ चमचा हळद
50 ग्रॅम तेल
21-26 कोरडी मिरची
मीठ - चवीनुसार
कुकिंग सूचना
स्टेप 1
प्रथम आंबे चांगल्या पद्दतीने धुवावे आणि धुवून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून एका ताटलीमध्ये ठेवावे. आंब्याचे जास्त मोठे तुकडे करू नये. आता गॅस वरती तवा ठेवावा आणि त्यामध्ये पाणी टाकावे. अजून त्यामध्ये मीठ टाकावे आणि पाण्याला हलक्या पद्दतीने गरम होऊ द्या. समजा आंबा जास्त आंबट नसल्यास पाण्यामध्ये मीठ कमी टाकावे.😋
स्टेप 2
थोड्यावेळाने पाणी जर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आंब्याचे तुकडे टाकावे आणि अर्धा तास त्यावरती झाकण ठेवावे. आता मसाला तयार करूया. यासाठी गॅस बारिक करून त्यावर भांड ठेवावे आणि त्यात जीरे आणि मेथीचे दाणे तळून घ्यावे.तळून झाल्यानंतर जीरे आणि मेथी एका दुसऱ्या भांडयांमध्ये काढावी आणि त्याच भांड्यामध्ये राई टाकावी आणि हिंग टाकून पुन्हा चांगले तळून घ्यावे. राई आणि हिंग चांगले तळून झाल्यानंतर सर्व मसाला मिक्सर मध्ये टाकावा आणि वरून थोडी हळद पावडर टाकावी आणि बारीक करून घ्या.😉
स्टेप 3
आता सगळ्या मसाल्याना एकत्र करून आंब्याच्या तुकड्यामध्ये टाकावे आणि बऱ्यांपॆकी मिसळून घ्यावे. त्यानंतर २ ते ३ तास सोडून द्यावे, तरच ते चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आता एका मोठया भांड्यामध्ये हे मिश्रण भरून ४ ते ५ दिवस चांगलं उन्हामध्ये ठेवून द्यावे. ४ ते ५ दिवसानंतर आंब्याचं लोणचे तयार होईल आणि त्याला चव सुद्धा चांगली येईल. ह्या लोणच्याला तेलामध्ये डुबवून ठेवावे. त्यामुळे फायदा असा होतो की,लोणचं ६ ते ७ महिने खराब होत नाही. लोणच एकदम स्वादिष्ट आणि त्याचा रंग बघून तुमच्या तोंडालाही पाणी सुटेल.🤤
No comments:
Post a Comment